Solapur : विद्यार्थ्यांनो 'ही' संधी सोडू नका, थेट परिवहन मंडळात मिळेल जॉब!

in #yavtmal2 years ago

सोलापूर 30 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून सोलापुरात शिकावू भरती प्रकिया सुरु झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे स्वयंरोजगार प्रशिक्षण घेतले आहे अशा विद्यार्थ्यांना या भरती प्रकिया मध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. शिकाऊ उमेदवार हा 2020, 2021,2022 या तीन वर्षात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत परीक्षा पास झालेला असावा. यामध्ये साधारण 5 विभागात ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आम्ही स्वतः जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना या संदर्भात पूर्व सूचना दिल्या आहेत. तांत्रिक दृष्ट्या हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पदांसाठी विशेष लक्ष द्यावे,असे सोलापूर विभागाचे सहाय्यक विभागीय नियंत्रक विवेक लोंढे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले.1) पदवीधर अभियांत्रिकी यासाठी 2 जागा शिल्लक आहेत. ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर इंजीनियरिंग पास असणारे तसेच ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ऑटोमोबाईल मेकॅनिकल पदविकाधारक उमेदवार या पदासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.2) मोटर मेकॅनिकल वेहिकल यासाठी 23 जागा शिल्लक आहेत. त्यापैकी 1 जागा अनुसूचित जाती एक जागा अनुसूचित जमाती यासाठी राखीव आहे. या रिक्त पदासाठी एसएससी पास असणे आवश्यक आहे. तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 2 वर्षाचा मोटर मेकॅनिकल वेहिकल हा कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे.

  1. मोटर वेहिकल बॉडी बिल्डर व वेल्डर या पदासाठी अनुक्रमे 7 व 1 जागा रिक्त आहेत. यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 1 वर्षाचा आयटीआय शीट मेटल वर्कर कोर्स पूर्ण पास असणे आवश्यक आहे.

  2. पेंटर या पदासाठी एक रिक्त जागा आहे त्यामध्ये उमेदवार हा एसएससी परीक्षा पास असावा तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून एक वर्षाचा पेंटर कोर्स पास असणे आवश्यक आहे.

या सर्व जागेसाठी दिनांक 2 जानेवारी 2023 पर्यंत उमेदवाराचे वय पंधरा वर्षापेक्षा कमी आणि 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षे इतका शिथिलक्षम कालावधी देण्यात आला आहे. तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थ भरती करताना राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या फक्त एका मुलाला तसेच राज्य परिवहन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाला अर्ज करता येईल.शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सदर उमेदवारास राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागात सहाय्यक पदाच्या सरळ सेवा भरतीच्या वेळी सहाय्यक पदासाठी थेट अर्ज करता येईल. साधारणपणे 32 प्रशिक्षणार्थी यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून साधारणपणे 10 हजार रुपये प्रति महिना इतके मानधन मिळणार आहे. मात्र त्यांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे बंधन महामंडळावर असणार नाही. तरी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठी नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 2 जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंद करायची आहे.solapur-13.jpg