ठरलं! शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, 30 सप्टेंबरला अर्ज दाखल करणार

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली: 23 सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर येत्या 30 सप्टेंबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी नामनिर्देशनपत्रांचे 5 संच मागवले आहेत. तसेच, ते विविध राज्यांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. 22 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, 24 सप्टेंबरपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर ठेवण्यात आली, तर 17 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल.

चौथ्यांदा निवडणुकीतून अध्यक्षाची निवडकाँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही चौथी वेळ आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा गांधी घराण्याव्यतिरिक्त असेल. 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाऐवजी इतर व्यक्तीकडे काँग्रेसची सूत्रे जाणार आहेत. अखेरचे बिगर गांधी अध्यक्ष सीताराम केसरी होते. त्यानंतर सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या.

या नेत्यांमध्ये निवडणूक होणारराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि लोकसभा सदस्य शशी थरूर यांच्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण, आणखी काही उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावेळी 9000 हून अधिक प्रतिनिधी मतदान करतील. काँग्रेस म्हणते की देशातील एकमेव असा पक्ष आहे ज्याचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जातोय.

tharoorpresident_202209887714.jpg