राज्यसभेसाठी संभाजी राजेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

in #yavtmal2 years ago

राज्यसभेच्या निवडणूकीमध्ये संभाजी राजे (Sabhaji Raje) हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे, शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंबंधी माहिती दिली. दरम्यान राष्ट्रवादीच्या पाठींब्यामुळे आता संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शरद पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, त्यावर हा निकाल आहे. मविआतील पक्षांशी अद्याप चर्चा केली नाही, पण राष्ट्रवादी पक्षापुरतं सांगायचे झाल्यास आमचा एक प्रतिनिधी निवडूण यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. त्यासाठीच्या मतांची गरज भागून आमच्याकडे 10 ते 12 मतं आमच्याकडे शिल्लक राहतात, शिवसेनेकडं सुध्दा काही मतं आहेत त्यांनाही काही अडचण नाही, कॉंग्रेसचा अकडा कमी जास्त असेल तर आमचे लोक त्यांना अनुमोदन देतील असे सांगितले.

Sort:  

👍