कानपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार; नमाजानंतर दगडफेक आणि तोडफोड, पोलिसांचा हवेत गोळीबार

in #yavtmal2 years ago

कानपूर: गेल्या काही दिवसात देशातील विविध भागात हिंदू-मुस्लिम हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. आजही उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर दोन समाजात मोठा गोंधळ उडाला. यतिमखाना चौकीजवळील बाजार बंद करण्यासाठी दोन समाजातील लोक समोरासमोर आल्याने दगडफेक सुरू झाली. गदारोळ आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही प्रचंड दगडफेक केली.

कानपूरमध्ये नमाजानंतर झालेल्या हिंसक चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत. मोहम्मद पैगंबरावर केलेल्या वक्तव्यामुळे हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. नमाजानंतर आंदोलन केले जाऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. मात्र एक हजारांपेक्षा जास्त लोक रस्त्यावर आले, त्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. संशयाच्या आधारे पोलिसांनी 18 हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद साहब यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरली होती. या संदर्भात मुस्लिम संघटनांनीही बाजार बंदची हाक दिली. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच, लाठीचार्ज करुन लोकांना पांगवण्यात आले. तरीही लोक अधूनमधून दगडफेक करत होते.

DGP आणि ADG LO यांना फोर्स पाठवण्याचे निर्देशया प्रकरणादरम्यान पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. या दगडफेकीत सुमारे 7 जण जखमी झाले.यूपी सरकारने डीजीपी आणि एडीजी एलओ यांना सूचना दिल्या आहेत. त्यानंतर 2 कंपनी PAC आणि 1 प्लाटून कानपूरला पाठवण्यात येत आहे. यासोबतच कानपूरमधील वातावरण हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात येत आहे.

कानपूर बाजार बंदजोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले. चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागात शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठा अंशतः किंवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. या गोंधळानंतर कानपूरच्या उर्वरित बाजारपेठांमध्येही शांतता पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इतर बाजारपेठांमध्येही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.