Weather Update : सौम्य थंडी, कोरड्याहवामानाची शक्‍यता

in #yavatmal2 years ago

आठवड्यात महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल ते १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब (Air Pressure) राहील. कमाल व किमान तापमानात (Temperature) वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात.त्याचा थेट परिणाम थंडीवर होतो. त्यामुळे या आठवड्यात सौम्य थंडी व कोरडे हवामान राहणे शक्‍य आहे. बहुतांशी जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील.

Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर
सातारा, सोलापूर, उस्मानाबाद व नगर जिल्ह्यांत आज व उद्या (ता.४, ५) अल्प ते अत्यल्प पावसाची शक्‍यता निर्माण होईल. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण मध्यम राहील. आज (ता. ४) अंदमान व निकोबार समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. हे वारे उद्या (ता. ५) बंगालच्या उपसागरात दाखल होतील व तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. मंगळवार व बुधवारी (ता. ६, ७) त्याचे लहानशा चक्रीय वादळात रूपांतर होईल. पुढे गुरुवारी (ता. ८) ते आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकून नंतर विरून जाईल. त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवणार नाही.

उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहील; मात्र दक्षिण भारतात थंडीचे प्रमाण तुलनेने कमी राहील. हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. विदर्भात दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी राहील. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे थंडीची तीव्रता कमी राहील. उत्तर महाराष्ट्र व विदर्भात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे किमान तापमानातील घट कायम राहून थंडीचे प्रमाणही चांगले राहील.n44846166616701496391995d0f8ba325ab5ca921f41a4f63878898e392247d0a5bd05fc94f6621f84a6363.jpg