'काश्मीर फाइल्स' प्रकरणी इस्रायलचा माफीनामा; लापिड यांनी केलेली टीका वैयक्तिक : राजदूत

in #yavatmal2 years ago

इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लापिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर केलेली टिप्पणी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी म्हटले आहे.इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीचे अध्यक्ष असलेल्या लापिड यांनी 'काश्मीर फाइल्स हा चित्रपट अत्यंत बटबटीत आणि प्रचारपट आहे,' अशा शब्दांत टीका केली होती. यावर काश्मीर फाइल्सचे मुख्य कलाकार अनुपम खेर, निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी जोरदार आक्षेप घेतला. शोशानी यांनी मंगळवारी खेर यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'आपण स्वत: किंवा इस्त्रायल सरकार अधिकृतरित्या किंवा अनधिकृरित्या लापिड यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत नाही. हा चित्रपट म्हणजे प्रचारपट नाही, तर त्यातून विस्थापित झालेल्या नागरिकांची व्यथाच मांडली गेली आहे', असे शोशानी म्हणाले. 'सोमवारी लापिड यांनी हे विधान केल्यानंतर आज सकाळी मी पहिला दूरध्वनी खेर यांना केला, तो माफी मागण्यासाठी. लापिड यांच्या विधानाशी इस्रायलचा कोणताही संबंध नाही, हेदेखील मी त्यांना सांगितले.' या वादामुळे भारत-इस्रायलचे संबंध अधिक दृढ होतील असा दावाही शोशानी यांनी केला.

टीकेला उत्तर देताना खेर म्हणाले की, 'लापिड हेच बटबटीत आणि प्रचारकी आहेत. त्यांना चित्रपट आवडला नसेल, तर ते तसे सांगू शकतात. मात्र ज्युरीचे अध्यक्ष असताना बटबटीत, प्रचारपट असे शब्द वापरणे गैर आहे. या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या व्यथा जगापर्यंत पोहोचल्या.' यावेळी खेर यांनी लापिड यांचा उल्लेख 'टूलकिट गँग' असा केला. फौदा या इस्रायली मालिकेतील सर्व कलाकार गोव्यात आले होते. मात्र सगळे लक्ष आपल्याकडे वळविण्यासाठी लापिड यांनी हे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप खेर यांनी केला आहे.n446976366166979511802377e04f8352257a0ec2765878b497ba6010bf068342662d1ccbae41e559c6dba8.jpg