"या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेलं! खोके व्यवस्थेतील खोके याच बिल्डरचे";

in #yavatmal2 years ago

इतकेच नाही तर सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला आणि तिथून गुवहाटीला नेण्यामागे या बांधकाम व्यवसायिकाचा मोठा हात होता असा दावाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय बांधकाम व्यवसायिकाचा थेट उल्लेख करत निशाणा साधण्यात आला आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. "एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते, पण महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारला तो त्यामुळेच. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं टीका केली आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जाणकार महाराष्ट्रात असताना नीती आयोगाप्रमाणे काम करण्याची अपेक्षा असलेल्या या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड कशी झाली असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. “नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे 'मित्र' म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रातn4486895761670210796255cea926ac5ac1f4953bcec86b227c4f4f56e0513a832e74e9e82a6ff73d8adbaf.jpg