FIFA World Cup 2022 : लिओनेल मेस्सी आज मैदानात

in #yavatmal2 years ago

विश्वकरंडक स्पर्धेतील आपल्या अखेरच्या मोहिमेवर निघालेला लिओनेल मेस्सी यंदाच्या स्पर्धेत उद्या पहिल्यांदा मैदानात उतरत आहे. त्याच्या अर्जेंटिनाचा सामना सौदी अरेबियाविरुद्ध होत आहे. वर्ल्डकपमध्ये सलामीला दारुण पराभव होण्याची सौदीची परंपरा आहे त्यामुळे अर्जेंटिना हा सामना किती गोलांनी जिंकणारा आणि मेस्सी कसा खेळणार याची उत्सुकता आहे. अर्जेंटिनाचा संघ गेल्या ३६ सामन्यांत अपराजित आहे आणि त्यात मेस्सीने सर्वाधिक गोल केले आहेत. मेस्सीचा हा पाचवा विश्वकरंडक आहे. दिएगो मॅराडोनाप्रमाणे त्यालाही विश्वकरंडक अर्जेंटिनात आणायचा आहे.
मोठी तफावतसौदी अरेबियाचा संघ अर्जेंटिनापेक्षा फिफा क्रमवारीत ४८ स्थानांनी पाठीमागे आहे. सौदीने खेळलेल्या गेल्या काही सामन्यांतील वेनेंझुला, कोलंबिया आणि क्रोएशिया यांच्याविरुद्धच्या लढतीत हार स्वीकारली आहे.सलामीला होते मोठी हारआशिया खंडातून पात्र होत असलेल्या सौदी अरेबिया संघाला विश्वकरंडक स्पर्धांत मात्र सलामीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागतो. २०१८ च्या स्पर्धेत रशियाविरुद्ध ०-५; तर २००२ च्या स्पर्धेत जर्मनीविरुद्ध ०-८ असे पराभूत झाले आहेत.अर्जेंटिनात इतरही खेळाडू तरबेजमेस्सी हा अर्जेंटिनाचा हुकमी एक्का असला तरी अर्जेंटिनाकडे ख्रिस्तियन मोमेरो, लिसांड्रो मार्टिनेझ, लियनद्रो पेरेदेस आणि अँजेल डि मारिया असे अनुभवी खेळाडू आहेत; मात्र मधल्या फळीतील जिओवानी लो सेल्सोची उणीव त्यांना भासू शकते.
दृष्टिक्षेपातविश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाचा सलामीला पराभव १९९० मध्ये कॅमेरुनविरुद्ध.लिओनेल मेस्सीचा उद्या देशातर्फे २० वा विश्वकरंडक सामना. दिएगो मॅरेडोना सर्वाधिक २१ विश्वकरंडक सामने खेळले आहेत.सौदी अरेबियाची सहावी विश्वककरंडक स्पर्धा.या स्पर्धेसाठी पात्र ठरताना सौदीने १८ पैकी एकच सामना गमावला.अर्जेंटिनाचा संघ गेल्या ३६ सामन्यांत अपराजितआमनेसामनेअर्जेंटिना आणि सौदी अरेबिया विश्वकरंडक स्पर्धेत प्रथमच खेळणारआजची लढत : अर्जेंटिना वि. सौदी अरेबियाकोठे होणार सामना : लुसैल आयकॉनिक स्टेडियम (क्षमता ८० हजार)वेळ : दुपारी ३.३० (भारतीय वेळ)थेट प्रक्षेपण : स्पोर्टस्-१८ आणि जिओ सिनेमामेस्सीच्या डोळ्यांत मी विश्वकरंडकाचे स्वप्न पाहिले आहे. विजेतेपदाच्या दडपणापेक्षा त्याचा भर खेळाचा आनंद घेण्यावर आहे. विश्वकरंडकाच्या या संपूर्ण मोहिमेचा सहकाऱ्यांसह त्यानेे आनंद घेतला आहे.- लिओनेल स्कोलोनी, अर्जेंटिनाचे प्रशिक्षकआमचा संघ गुणवान तरुणांचा आहे. पात्रता मिळवण्याचे पहिले उद्दिष्ट आम्ही पार केले आहे. आता मुख्य स्पर्धेत चांगल्या खेळाचा इरादा आहे.- हेर्वे रेनार्ड, सौदीचे प्रशिक्षक