महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल! कॅन्सरशी देत आहेत झुंज

in #yavatmal2 years ago

कतारमध्ये खेळल्या जाणार्‍या फिफा विश्वचषक 2022 दरम्यान एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले कर्करोगाशी झुंज देत आहेत. यावेळी त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गंभीर असे काहीही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.