आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर सहा पदाचे ओझे; एक व्यक्ती, एक पदाचा काँग्रेस नेत्यांना पडला विसर

in #yavatmal2 years ago

IMG-20220523-WA0020.jpg

यवतमाळ : जिल्ह्यात, राज्यात आणि देशात काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व जोपासण्यासाठी धडपडत आहे. उदयपूर येथे काँग्रेसने नव्या ऊर्जेसाठी शिबिरात चिंतन केले. एक व्यक्ती, एक पदाची हाक दिली.आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर सहा पदाचे ओझे दिले. नुकतीच त्यांची अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एक व्यक्ती, एक पदाचा काँग्रेस नेत्यांना पडला विसर पडल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

डॉ. मिर्झा यांच्याकडे आमदार, राज्यमंत्री दर्जाचं वक्फ बोर्ड अध्यक्ष, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय अभ्यासगत मंडळ अध्यक्ष पद, सदस्य - अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगट पदावर आधीच आहेत. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकंमाडलाच उदयपूर येथे केलेल्या नवसंकल्प चिंतन शिबिराचे विसर पडल्याने काँग्रेस नेत्यांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची काही नेत्यांची भावना आहे.
एकेकाळी यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याच यवतमाळ जिल्ह्याने काँग्रेसला दोन मुख्यमंत्री दिले होते. काँग्रेस जिल्ह्यातून पुर्ण भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. पुसद येथील वजाहत मिर्झा यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष पद देण्यात आलं. त्यानंतर एकापाठोपाठ पाच पद त्यांना देण्यात आली. सामान्य माणूस काँग्रेस पासून दूर गेला आहे. नेतेही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. केवळ निवडणूक आली की, स्वतःला आणि मुलाला उमेदवारी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करतात. एकाच व्यक्तीला विविध प्रकारचे पद देऊन काँग्रेस नेतृत्व काय सिद्ध करीत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.