यवतमाळ : विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात

in #yavatmal2 years ago

IMG-20220430-WA0124.jpg

विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झालेला युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवासी-गोवारी समाज संघटने कडुन सावळी सदोबा येथे भव्य आंदोलन*
(इंजिनीयर हटाव अशा घोषणा देत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली)

यवतमाळ : आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरामध्ये अनेक विद्युत समस्या आज ही कायम आहेत,विज वितरण कंपनीच्यी हलगर्जीपणामुळे व इंजीनियर शेख यांच्या मनमानी कारभारामुळे मौजा उमरी (कोपेश्वर) येथील प्रमोद निवारे या युवकांची मृत्यूशी झुंज देत आहे,अत्यंत गरीब कुटुंबातील शेतमजूर प्रमोद नेवारे वय ३४ वर्ष हा युवक शेतामध्ये शेतमजुरी करताना,विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे,एका शेतामधून जाणार्या व खाली लोंबकळत असलेल्या ३३ केव्ही पोलवरील जिवंत तार,प्रमोद नेवारे यांच्या अंगावर पडल्याने,त्याचे शरीर मोठ्या प्रमाणात भाजले गेल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले असतांना,अपघात ऐवढा मोठा होता की उपचार करताना प्रमोद नेवारे यांच्या एक हात व दुसऱ्या हाताची दोन बोटे तोडण्यात आलेली आहे,एवढा मोठा अपघात झालेला असताना,विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन या युवकाला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत तर मिळाली नाही,अपघात ग्रस्त युवकांची विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून साधी विचारपूस पण करण्यात आलेली नाही,विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा जाहीर निषेध म्हणून,इंजिनीयर हटावं अशा घोषणा देत,आज सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर प्रमोद नेवारे या गरीब युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवासी-गोवारी समाज संघटने कडुन भव्य आंदोलन करण्यात आले,यावेळी उपस्थित लोकनेते मा.बाळासाहेब शिंदे,मा.जितेंद्र भाऊ मोघे,मा.सचिन चचाने,मा.कृष्णाभाऊ पुसनाके,सुरेश जयस्वाल,अहेमद तंवर,नुनेश्वर आडे,दत्तु भाऊ समगिर,अविनाश भगत,पुंडलिक गांजरे,राजेश नागोसे,संजय बोटरे,सुशिल राऊत,संतोष कोहरे सह सावळी सदोबा परिसरातील आदिवासी-गवारी बांधवासह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.