रक्षा मंत्रालयाच्या परीक्षेत, पुसदचा अक्षय चव्हाण देशात प्रथम

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-05-09-09-38-14-08_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

यवतमाळ : केंद्र शासनाच्या रक्षा मंत्रालय तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये पुसद येथील अक्षय आकाश चव्हाण यांनी भारतातून प्रथम येण्याचा मान पटकला. त्यामुळे पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अक्षय चव्हाण यांचे राहते घरी भेट देऊन भीमशक्ती सामाजिक संघटना पुसदच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे, परिस्थिती कितीही बिकट असली तरी प्रयत्न सोडू नका कारण यशाची प्राप्ती प्रयत्नाने होते, असे मत व्यक्त केले.