शेतकऱ्यांनी ऑनलाईन बोलाविलेले खत,बियाणे, कीटकनाशक कृषी विभागाने पकडले

in #yavatmal2 years ago

IMG-20220605-WA0027.jpg

यवतमाळ: विक्रीचा अधिकृत परवाना नसलेले विविध नामांकित कंपण्यांचे कपाशी बियाणे, रासायनिक खते, व कीटकनाशक औषधी यवतमाळ तालुक्यातील वागदा येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. कृषी अधिकारी यांचे फिर्यादीवरून वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परिसरातील काही शेतकऱ्यांनी पोर्टल वर ऑनलाईन बुक करून आपल्या पसंतीचे बियाणे, खते व कीटकनाशक औषधी बोलाविले होते. नागपूर येथील एका गोडाऊनमधून कुरियरच्या माध्यमाने चार चाकी वाहनाने सदर माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहचला. बियाणे शेतकऱ्यांकडे पोहचण्या आधीच कृषी विभागाला याचा सुगवा लागल्याने कृषी सहाय्यक सचिन वाघमारे यांनी सदर मुद्देमाल कुरियर सेवेच्या दोन कर्मचाऱ्याकडून आपलें ताब्यात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वागदा येथे पोहचुन पंचनामा केला. विविध नामांकित कंपन्याचे सदर बियाणे, खाते , व औषधी विक्री करण्याचा अधिकृत परवाना नसल्यामुळे शहानिशा करून तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पांडुरंग फाळके यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून वडगाव पोलिसांनी नागपूर येथील गोडाऊन किपर महेश बिभीषण पाटील याचे विरुध्द कृषी कायद्या अंतर्गत विविध कलमा सह भादवी कलम 420 , 465 (फसवणूक व बनवाटिकरण) अन्वये गुन्हा दाखल केला. वडगाव पोलिसांनी एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे एक वाहन व एक लाख 32 हजार 732 रुपयाचा माल असा एकूण दोन लाख 75 हजार 732 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार पवन राठोड हे करीत आहे.