जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून विरुगिरी ; शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-05-10-10-03-07-37_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून दिग्रसच्या श्याम गायकवाड याने विरुगिरी आंदोलन केले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी त्याने लावून धरली. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर 7 या शाळेच्या जमिनिवरील आणि काही शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन गरिबांना वाटप करण्यात यावी,तसेच आपल्यावरील जुना आत्महत्येचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढला. घटनास्थळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, आपत्ती पथक, अग्निशमन दल दाखल झाले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.