कारागृहातून बाहेर आलेल्या युवकाची हत्या : यवतमाळच्या पाटीपुरा येथील घटनेत दोघे जण गंभीर जखमी

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-05-09-09-34-08-45_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7.jpg

यवतमाळ : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कोविड काळात अमरावती येथील कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा खून करण्यात आला. तर, दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना पाटीपुरा येथील जयभीम चौकात घडली. नऊ ते दहा जणांच्या टोळक्यावर खुनासह प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

मृत व जखमी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. तर, एका जखमीची निर्दोष मुक्तता झाली होती. वैभव कृष्णराव नाईक (वय 23, रा. बांगरनगर) असे मृताचे नाव आहे. सुहास अनिल खैरकार (वय 26, रा. अशोकनगर), नयन नरेश सौदागर (वय 22, विठ्ठलवाडी, यवतमाळ), अशी जखमींची नावे आहे.याबाबत यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात आदेश अनिल खैरकार (वय 24, रा. अशोकनगर) याने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. 30 एप्रिल 2022 रोजी शुभम वासनिक याच्या प्रेयसीचा अपघात झाला. त्यानंतर टोळक्यासोबत वाद झाला होता.त्याचा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.