बनावट नोटांची विक्री करणारे चौघे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-04-30-22-43-51-28_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

यवतमाळ : भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगून त्याची विक्री करणार्‍या टोळीतील चार जणांना सापळा रचून गजाआड करण्यात आले. ही कारवाई पांढरकवडा रोडवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.सय्यद वसीम सय्यद जमिल (वय 23, रा. बिलालनगर), वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा (वय 27, रा. पाटील ले-आउट), दानिश शहा तयब शहा (वय 19, रा. सुंदरनगर, भोसा रोड), शाकीब हमीद अकबानी (वय 21, रा. मेमन कॉलनी), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अंगझडतीत दोनशे रुपयांच्या 89 नोटा मिळून आल्या. तर शाकीब अकबानी याच्याकडून 19 नोटा जप्त केल्या. आरोपींडून दोनशे रूपयांच्या 108 बनावट नोटा, दोन दुचाकी, चार मोबाइल, असा एकूण 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.