शिंदेंचं घरोघरी गणपती दर्शन; अजित पवारांकडून 'शो मॅन'ची उपमा

in #yavatmal2 years ago

यावरुन राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला उत्सव आहे. पण याआधी कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र त्यावेळी मीडिया कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसेच काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.पुढे शिवतीर्थ आणि दसरा मेळावा मैदानासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दोघांनाही परवानगी घेण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता बघत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्या ज्या राजकीय घडामोडी घडतायत, त्या सर्वांनी पहिल्या आहेत. ज्यां