Nashik News : रामतीर्थावरील यात्रोत्सवात भंडाऱ्याची उधळण; ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जागर

in #yavatmal2 years ago

bhandara_festival_of_pattankodoli_06.jpg
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Nashik News : रामतीर्थावरील यात्रोत्सवात भंडाऱ्याची उधळण; ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जागर
Published on : 29 November 2022, 1:30 am

By
सकाळ वृत्तसेवा

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा नाशिक : गोदावरीच्या तीरावरील रामतीर्थ परिसरातील खंडोबाचा यात्रोत्सव चंपाषष्ठीला मंगळवारी (ता. २९) होत असून, भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण मुक्तहस्ते होईल. त्याच वेळी ‘सदानंदाचा यळकोट', ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जागर होईल. यात्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळपासून व्यावसायिकांनी तयारी सुरू केली. (Bhandara spilling over during Yatra festival on Ram Teertha champa shashti nashik Latest Marathi News)

चंपाषष्ठीनिमित्त देवांचे टाक भेटीचा कार्यक्रम इथे होईल. गुरुवार (ता. २४)पासून षड्रात्रोत्सवास सुरवात झाली आहे. त्याची सांगता चंपाषष्ठीला होईल. रामतीर्थ परिसरातील खंडोबा स्थानाची अख्यायिका शहरवासीयांमध्ये प्रचलित आहे. पूर्वी आबा बेळे यांना झोपेत ‘मी पाण्याखाली आहे ,मला बाहेर काढ’, असा साक्षात्‍कार झाल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आबा स्‍नानासाठी गोदावरी तीरावर गेले असताना त्‍यांच्या पायाला खरखरीत दगड लागला. त्‍यांनी त्‍याच्‍या भोवतीची स्‍वच्छता केली. त्‍यांना कोटम आकारातील (कोटम म्‍हणजे भंडारा असलेले चौकोनी पात्र) पूर्व-पश्‍चिम अशी दगडी कोरीव खंडोबा व म्‍हाळसा घोड्यावर आरूढ एक छोटी मूर्ती व शेजारी तिची प्रतिकृती मोठ्या आकारातील मूर्ती सापडली. हे खंडोबा स्‍थान गोदापात्रात आहे. तसेच ते पुराच्या पात्रात येत असल्‍याने पावसाळयात खंडोबा स्‍थान पाण्यात असते.हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??