Free MSRTC Tour : केवळ 52 दिवसातच 1 कोटीहून अधिक ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास!

in #yavatmal2 years ago

मालेगाव (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शिंदे-फडणवीस सरकारने २६ ऑगस्टपासून एसटी बसमध्ये राज्यात सर्वत्र मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. शासनाचा निर्णय व लालपरीतील या प्रवासाला ज्येष्ठांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील ३१ विभागांतून केवळ ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. राज्यात रोज सरासरी दोन लाखांवर नागरिक ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या योजनेचा प्रवास करून फायदा घेत आहेत. विरोधक व सोशल मीडियावर ट्रोल होणारी ही योजना ज्येष्ठांनी यशस्वी करून दाखविली आहे. (More than 1 Crore seniors travel for free MSRTC Bus in just 52 days Nashik Latest Marathi News)2MSRTC_7.jpg