Solapur : …म्हणून त्याने 20 वर्षीय बायकोचं टक्कल केलं! कारण ऐकून अवाक् व्हाल

in #yavatmal2 years ago


तिचं नाव सुमय्या! राहायला सोलापुरात, नवऱ्याने सुमय्याला टक्कल करायला का भाग पाडलं? वाचा
सोलापूर : परपुरुषाने पाहू नये म्हणून चक्क पतीने आपल्याच पत्नीचं टक्कल केलं. ही धक्कादायक घटना सोलापूर (Solapur Crime News) जिल्ह्यात घडली. पोलिसांत (Solapur Police) या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय. एका 20 वर्षीय विवाहितेसोबत हा संतापजनक प्रकार घडलाय. पत्नीचं टक्कल केल्याच्या 3 महिन्यांनंतर या प्रकरणाला वाचा फोडण्यात आलीय. पीडितेनं आपली व्यथा पोलिसांसमोर मांडल्यानंतर पोलीसही (Husband Wife News) सगळा प्रकार ऐकून अवाक् झाले होते.