‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

in #yavatmal2 years ago


'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात; अल्लू अर्जुनच्या लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
मुंबई- ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘पुष्पा- द रूल’ या सीक्वेलचं शूटिंग रविवारपासून सुरू झालं. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मिरोस्लॉ कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पहायला मिळतोय. ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याच्या सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.