किडनीच्या आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे नका करू दुर्लक्ष, निष्काळजीपणा पडू शकतो महाग

in #yavatmal2 years ago


खराब लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच दिसू लागतात, मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
जगभरात किडनीच्या (kidney disease) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. किडनी खराब झाल्यास रुग्णांना डायलिसिसचा (dialysis) आधार घ्यावा लागतो. मात्र एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) झाल्यास अनेक रुग्ण वेळेवर डायलिसिस करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची तब्येत (effect on health) बिघडू शकते. क्वचित हे जीवघेणेही ठरू शकते. किडनी डिसीज क्वॉलिटी ऑफ लाईफच्या अभ्यासात 2787 लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्या सर्वांनाच क्रॉनिक किडनी डिसीजचा त्रास होता.

या अभ्यासात सहभागी झालेल्या 98 टक्के लोकांना कमीत कमी एका लक्षणाचा अनुभव आला. 24 टक्के लोकांना (छातीत त्रास होणे) आणि 83 टक्के लोकांना थकवा, असा त्रास जाणवला. यापैकी 690 लोकांनी किडनी रिप्लेसमेंट थेरपी (केआरटी) सुरू केली होती, परंतु त्यापैकी 490 सहभागींचे केआरटीच्या आधीच निधन झाले. या लोकांनी किडनीच्या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही. किडनीच्या आजाराची लक्षणे गंभीर झाली की तो पेशंट क्रॉनिक किडनीच्या आजाराचा बळी ठरतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशावेळी डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागते