IND vs AUS: सूर्यकुमार यादवचा फटका पाहून सुनील गावस्करही चक्रावले, म्हणाले हा फटका तर...

in #yavatmal2 years ago

IND vs AUS: सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. विराट कोहलीनंतर येऊनही त्याने भन्नाट फटकेबाजी करत कोहलीच्या आधीच अर्धशतक झळकावले. सूर्याचा एक फटका पाहून यावेळी सुनील गावस्करही चक्रावले. हा फटका पाहिल्यावर सनी यांनी नेमकं काय म्हटलं आहे, या फटक्याचा पाहा खास व्हिडिओ यावेळी पाहा ...
हैदराबाद : सूर्यकुनार यादवने आजचा तिसरा सामना चांगलाच गाजवला. विराट कोहलीनंतर सूर्या मैदानात उतरला. पण सूर्याने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत विराट कोहलीपूर्वीच अर्धशतक झळकावले. सूर्याचा एक फटका पाहून तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करही चक्रावले.
भारताचे दोन विकेट्स पडले असले तरी त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. विराट कोहलीनंतर येऊनही त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत कोहलीच्या आधीच अर्धशतक झळकावले. सूर्या आता मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण मोठा फटका मारताना सूर्या बाद झाला. सूर्याने यावेळी ३६ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६९ धावांची दमदार खेळी साकारली.
सूर्याने जेव्हा आपले अर्धशतक साकारले, तेव्हा गावस्कर यांनाच त्याचा फटका चांगलाच आवडला. गावस्कर यावेळी म्हणाले की, " सूर्याचा हा एक भन्नाट शॉट आहे. या फटक्याला हॅलिकॉफ्टर शॉट आपण म्हणू शकत नाही. हा फटका त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे. हा सूर्याचा एक खास शॉट आहे, कारण यापूर्वी असा फटका पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्याच्या या फटक्याचे कौतुक नक्कीच करायला हवे."

सूर्याने यावेळी लेग साइडला एक फटका मारला जो धोनीच्या हॅलिकॉफ्टरसारखा होता. पण सूर्याने यावेळी त्याच्यापेक्षा भन्नाट फटका मारला. या फटक्याचे कौतुक क्रिकेट विश्वात सर्वच करत आहेत. कारण हा फटका यापूर्वी पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्याने हा फटका कसा मारला, याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली होती. सूर्याने या सामन्यात ६९ धावा रचल्या, पण तो बाद झाल्यावर कोहलीने अर्धशतक झळकावले. कोहली भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी नाबाद राहता आले नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला आणि त्याला ६३ धावा करता आल्या. कोहली बाद झाल्या दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. त्यामुळे हार्दिक आणि दिनेश यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.ind-v-aus-94439517.jpg