Winter Session : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?

in #yavatmal2 years ago

2vidhan_20bhavan_6.jpgताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Winter Session : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?
Published on : 26 November 2022, 1:39 am

By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाआधी म्हणजे, ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. अधिवेशनाआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या असून, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आठवडाभरात महत्त्वाची बैठक होऊ शकते.
त्यापाठोपाठ हे दोन्ही नेते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांची भेट घेऊन विस्तार जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ९ ऑगस्टला पहिला विस्तार करून त्यात, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या प्रत्येकी ९ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

मात्र शिवसेनेत बंड करताना शब्द देऊनही काही आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड झाली. अशा आमदारांची समजूत काढून, १५ सप्टेंबरपर्यंत दुसरा विस्तार करण्याचे आश्वासन दोन्ही गटांकडून दिले होते. प्रत्यक्षात आता नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत नव्या मंत्र्यांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे विशेषतः शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत भर पडत असल्याची चर्चा आहे. दिवाळी मिलन कार्यक्रमात फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारावर स्पष्टपणे बोलले होते.