Governor Koshyari : शरद पवारांनी भाषणात उल्लेख करून निषेध करायला हवा होता -उदयनराजे

in #yavatmal2 years ago

2Satara_MP_Chattrapati_Udayanraje_Bhosale.jpgराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानावरूनही वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता छत्रपती शिवरायांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी या दोघांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

या विधानाबद्दल उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला आधार काय असा प्रश्नही उपस्थित केला आहे. उदयनराजे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जुना झाला हे जेव्हा मी ऐकलं राज्यपालांच्या तोंडून तेव्हा मला एक क्षणभर काही कळलंच नाही. माझ्या मनात विचार आला की राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याला आधार काय? ज्या वेळी देशभरात अनेक राजे मुघलांना शऱण गेले होते, तेव्हा शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती होती, जे त्यांच्या विरोधात गेले. "