PM Narendra Modi : जग भारताकडे आशेने पाहाते आहे; पंतप्रधान मोदी

in #yavatmal2 years ago

Untitled_4.gif
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

PM Narendra Modi : जग भारताकडे आशेने पाहाते आहे; पंतप्रधान मोदी
Published on : 26 November 2022, 7:32 pm

By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘ज्या देशाला आपले स्वातंत्र्यही टिकवून ठेवता येणार नाही अशी भीती ७५ वर्षांपूर्वी व्यक्त केली जात होती त्याच भारताकडे आज सारे जग मोठ्या आशेने पाहत आहे.’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुलभ- सोईस्कर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वेगाने पावले उचलली आहेत असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या राज्यघटना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी यानिमित्त ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रम आणि संकेतस्थळांचेही उद्‍घाटन केले. पंतप्रधान म्हणाले की , ‘‘ स्वतंत्र भारताने १९४९ मध्ये याच दिवशी स्वतःच्या नवीन भविष्याची पायाभरणी केली होती व ती होती आपली राज्यघटना.
यावेळचा राज्यघटना दिनही विशेष आहे कारण भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी जगभरातल्या लोकांना आमच्या अपयशाची भीती होती की आम्ही आमचे स्वातंत्र्य राखू शकणारच नाही पण आम्ही यशस्वी ठरलो. आमची राज्यघटना हाच या यशाचा पाया आहे.’’ महाभारतातील एका श्लोकाचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की ‘लोककल्याण आणि सार्वजनिक संरक्षण ही दोन्ही सरकारचीच कामे आहे. ‘आम्ही भारताचे लोक'' हे राज्यघटनेच्या पहिल्याच वाक्यातील सुरवातीचे फक्त तीन शब्द नसून ते एक अमूर्त तत्वज्ञान आहे.’

महिलांचे जुने कायदे बदलणारपंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारत आज जागतिक शक्ती म्हणून पुढे आला आहे. मात्र आमच्यासमोर आणखीही काही आव्हाने आहेत. विशेषत: महिलांसाठीचे जुने कायदे रद्द करणे हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम आहे.भारताने टीम म्हणून सादर व्हावे‘आम्हाला ‘जी-२०’ गटाचे अध्यक्षपद मिळाले ही मोठी उपलब्धी आहे. स्वातंत्र्याचा हा अमृत काळ म्हणजे देशाबद्दल प्रत्येकाच्या कर्तव्य पालनाची सुयोग्य वेळ आहे’ असे सांगून मोदी म्हणाले की ‘भारताने आज स्वतःला एक ‘टीम'' म्हणून जगासमोर ठामपणे सादर केले पाहिजे.’ लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या तरुणांची विचारसरणी भविष्याभिमुख आहे.‘घटनात्मक लोकशाहीत कोणतीही संस्था शंभर टक्के परिपूर्ण नसते. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी देशात जी कॉलेजियम पद्धत अवलंबिली जाते तीही याला अपवाद नाही,’ असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनतर्फे आयोजित राज्यघटना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकांना न्यायालयापर्यंत यायला लावण्याऐवजी न्यायव्यवस्थेनेच लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात तांत्रिक पायाभूत सुविधा मजबूत करून आम्ही लोकांना न्याय मिळवून दिला, असेही चंद्रचूड म्हणाले.‘केवळ कॉलेजियम व्यवस्थेत सुधारणा करून किंवा न्यायाधीशांचे पगार वाढवून चांगले पात्र लोक खंडपीठात सामील होतील याची खात्री नाही’ असेही न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. जेव्हा आपण अपूर्णतेबद्दल बोलतो तेव्हा विद्यमान व्यवस्थेमध्ये आपल्या पद्धतीने कार्य करणे हाच उपाय आहे असेही ते म्हणाले. कॉलेजियम पद्धतीबाबत केंद्र सरकारकडून व विविध स्तरांतून सातत्याने आक्षेप घेतले जात असताना सरन्यायाधीशांनी या विषयावर थेटपणे भाष्य करणे सूचक मानले जाते.वकिलांनी सेवेत यावेसरन्यायाधीशांनी सांगितले की, ‘‘ न्यायव्यवस्थेत चांगली माणसे मिळविणे म्हणजे केवळ कॉलेजियममध्ये सुधारणा करणे नव्हे. तुम्ही न्यायाधीशांना किती पगार द्यावा हा न्यायाधीश नेमण्याचा अर्थ नाही. तुम्ही न्यायाधीशांना जो पगार द्याल तो वकिलांच्या एका दिवसाच्या कमाईचा अंश असेल. त्याऐवजी वकिलांनी न्यायाधीश म्हणून खंडपीठात सामील होणे हा विवेक आणि सार्वजनिक सेवेप्रतिची बांधिलकी आहे.’’