मुळा-पवना नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा; धरणांतून १० हजार क्युसेकने विसर्ग

in #vedant2 years ago

2Pawana_2.jpgFriday, September 16, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

मुळा-पवना नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा; धरणांतून १० हजार क्युसेकने विसर्ग
Published on : 16 September 2022, 11:13 am

By
सकाळ वृत्तसेवा
मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पिंपरी - मुळशी व मावळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे व धरणांतून केलेल्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा व पवना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत. पवना धरणाच्या सांडव्याद्वारे शुक्रवारी दुपारी तीन वाजता आठ हजार ६०० आणि वीज निर्मिती केंद्रातून एक हजार ४००अशा दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल, असे धरण प्रमुख समीर मोरे यांनी कळविले आहे. तसेच, मुळशी धरणाच्या सांडव्यावरून दुपारी दोन वाजता २६ हजार ४०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवून तो ३५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येईल, असे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी कळविले आहे.मुळा नदीवर मुळशी धरण असून पवना नदीवर पवना धरण आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व धरणाच्या खालील बाजूस गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यापूर्वीच दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे मुळा व पवना धरणातून विसर्ग सुरू होता. बुधवारी सायंकाळपासून तो वाढविण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्यात बदल संभवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन मुळशी व पवना धरणप्रमुखांनी केले आहे.