Boycott Indian Idol 13: आता बस्स! इंडियन आयडॉल 'बॉयकॉट'! नेटकऱ्यांचा संताप

in #tv2 years ago

Boycott Indian Idol 13: नेटकऱ्यांनी कधी काय खटकेल याचा भरवसा नाही. आता ते प्रसिद्ध टीव्ही मनोरंजन शो इंडियन आयडॉलवर संतापले आहे. त्यांनी या शो वर बहिष्काराची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडला बॉयकॉट करण्याची सातत्यानं मागणी होताना दिसतेय. याचा फटका प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अक्षय कुमारला बसला होता. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नाकारले होते. ते प्रकरण कुठे शांत होत नाही तोच आता इंडियन आयडॉलवर बहिष्कार घातला जावा असे नेटकरी म्हणू लागले आहेत.

गेल्या दीड दशकांहुन अधिक काळ इंडियन आयडॉल या मालिकेनं चाहत्यांची पसंती मिळवली आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. बऱ्याचदा हा शो त्यातील परीक्षक आणि त्यांच्या आडमुठेपणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. सध्या या शोमधून अन्नु मलिक यांना निरोप देण्यात आला असून प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांना परिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यापासून या परिक्षकांनी त्यांच्या वागण्या बोलण्यात बदल केल्याचे दिसून आले आहे.
RECOMMENDED ARTICLES

सांडव्यावरील देवी मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ; अनेक महिलांनी मांडले घट
पंचवटी (जि. नाशिक) : अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदाघाटावरील सांडव्यावरील देवी मंदिरात सोमवार (ता. २६)पासून नवरात्रोत्सवास सुरवात झाली. देवी मंदिरमागे असलेल्या कालभैरव मंदिरालगत अनेक महिलांनी घट मांडले आहेत. देवीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर
5 hours ago

108च्या खोळंब्याने महिलेची प्रकृती चिंताजनक; रुग्णांची हेळसांड
अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथील बानू रवींद्र भिल हिला प्रसूती कळा जाणवू लागल्याने नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. अमळनेरच्या १०८ रुग्णवाहिकेला तांत्रिक अडचण आल्याने १०८ चे डॉ. वसीम राजा अन्सारी यांनी पातोंडा येथील १०८ रुग्णवाहिका मागवली. पातोंडा येथून रुग्णवाहिका मागवल्याने व
5 hours ago

Shinde vs Thackeray Live : निवडणुक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो- कौल
निवडणुक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. खरी शिवसेना कोणती हा प्रश्न असल्याने बहुमत महत्त्वाच आहे. पक्षसदस्य म्हणून आयोगाकडे जाण्याचा अधिकार आहे. पक्षचिन्हाचा वाद परिच्छेद १५ नुसार सोडवता येईल. असेह कौल यांनी म्हटलं आहे.
5 hours ago
शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली? वकील सिंघवी यांनी केला खुलासा
राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपुर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, सुनावणीला सुरूवात होताच ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले? असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी शिवसेनेचे वक
5 hours ago

सध्या इंडियन आयडॉलचा तेरावा सीझन सुरु आहे. त्यातील काही गोष्टी या स्क्रिप्टेड असल्यानं नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम हा प्रेक्षकांच्या मनोरंजनावर होत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सगळचेच जर स्क्रिप्टेड असेल तर मग तो शो पाहण्यात काय मजा....दरवेळी ते रडणे, एखाद्याला बोलणे, अमुक एखाद्या कंटेस्टंला फेव्हर करणे यामुळे त्या शोचा टीआरपी कमी होतोय. अशी नाराजी प्रेक्षक सोशल मीडियावरुन व्यक्त करु लागले आहेत.WhatsApp_Image_2022_09_27_at_2_48_44_PM.jpeg