नागपूर : इलेक्ट्रिक बसमधून चक्क मोफत प्रवास!

in #tiwari2 years ago

press_04dec20_03_1607078390902_1607078401164.jpegनागपूर : महापालिकेला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या असून यातील दहा बस रस्त्यांवर धावत आहेत. यापैकी तीन बस वाहकांशिवाय असून यात तिकिटासाठी डिजिटल कॅशने व्यवहार करण्यात येते. परंतु या व्यवहारासाठी आवश्यक स्वाईप कार्ड नसल्याने अनेकजण बसमधून बसत आहे. यात वाहकही नसल्याने नागरिकांचे चांगलेच फावले असून त्यांना मोफत प्रवासाचा आनंद लुटता येत आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रती किमी २० रुपये नुकसान होत असल्याचे सुत्राने सांगितले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहराला १७ इलेक्ट्रिक बस मिळाल्या. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यातील तीन बस वाहकांशिवाय आहेत. अर्थात तिकिटासाठी कंडक्टरची सोय नसून बसमधील मशीनमध्ये चलो ॲप कार्डचा वापर करायचा आहे. परंतु चलो ॲप कार्डबाबत कुठलीही जनजागृती न करता महापालिकेने या तीन बस सुरू केल्या. त्यामुळे नागरिकांकडे चलो ॲप कार्ड नाही. बसमध्ये कंडक्टर नसल्याने मशीनचे नेमके काय करायचे, याचाही नागरिकांना पत्ता नाही. त्यामुळे या बसमधून सध्या नागरिकांना मोफत प्रवास करण्याची नामी संधी मिळाली आहे.

Sort:  

hi ples my post like and flow