होत्याचं नव्हतं झालं! विजय सेतूपतीच्या सेटवर स्टंट मॅनचा मृत्यू, आयुष्याचा स्टंट हरले सुरेश

in #pusad2 years ago

चैन्नई- विजय सेतुपती च्या आगामी 'विदुथलाई' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ५४ वर्षीय स्टंट मास्टर एस सुरेश यांचे निधन झाले. वंदलूरमध्ये विदुथलाईच्या शूटिंगदरम्यान स्टंट मास्टर २० फूट उंचीवरून खाली पडले. सिनेमाच्या सेटवर ही घटना घडली आणि ही बातमी आगीसारखी पसरली. सुरेश स्टंट डिरेक्टरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते.
स्टंट मास्टर सुरेश यांचा मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, स्टंट मास्टर एस सुरेश यांना एक स्टंट करायचा होता, ज्यामध्ये त्यांना २० फूट उंचीवरून उडी मारावी लागली. दुर्दैवाने क्रेनला दोरीने बांधलेले असतानाही दोरी तुटल्याने ते खाली पडले. त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघातानंतर तपास सुरू झाला
सेटवर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तपास सुरू केला. सुरेश २५ वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत होते. ते सुरुवातीपासून स्टंट मॅन होते आणि स्टंट करतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. विदुथलाई सिनेमात सुरीसोबत विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं चित्रीकरण दोन भागात होणार आहे. अपघातामुळे सध्या शूटिंग थांबवण्यात आलं आहे. विजय सेतुपती यांनीही त्यांच्या ट्विटरवर सिनेमाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत.
सिनेमाचं चित्रीकरण सत्यमंगलच्या जंगलात झालं
विजयने यापूर्वी सांगितलं होतं की, सिनेमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग संपले आहे. दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरू असताना ही घटना घडली. विदुथलाई सिनेमात विजय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. जिथे तो वाथियारच्या भूमिकेत सुरीला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. क्राईम-थ्रिलर शैलीतील सिनेमात सुरी, विजय तसेच प्रकाश राज, गौतम मेनन, किशोर, भवानी श्री, राजीव मेनन, चेतन यांच्या भूमिका आहेत. सिनेमातील बहुतांश सीन सत्यमंगलमच्या जंगलात शूट करण्यात आली आहेत.vijay-setupathi-95990750.jpg

Sort:  

Please like my post