जान्हवी कपूरच्या बाथरूमच्या दरवाजाला नाही लॉक? आई का लावू देत नव्हती कडी

in #pusad2 years ago

मुंबई- बॉलिवूड स्टार श्रीदेवी यांचा दुबईतील ज्या हॉटेलच्या बाथरुममध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला तेव्हा तिथे बाथरुमला कडी लावली नव्हती. श्रीदेवी कधीच त्यांच्या बाथरुमचं दार आतून लॉक करत नव्हती. इतकंच नव्हे तर मुलगी जान्हवीलाही ती बाथरुमला आतून कडी लावू द्यायची नाही. जान्हवीच्या घरातील बाथरुमला आजही लॉक बसवलेलं नाही. नुकतंच जान्हवीने श्रीदेवी यांनी चैन्नईत खरेदी केलेल्या पहिल्या घराची सफर चाहत्यांना घडवली. या घराच्या बाथरुमच्या दरवाजाला लॉक नाहीय. कोट्यवधींच्या घराच्या बाथरुमला आतून कडी नसण्याचं नेमकं कारण तरी काय आहे?

जान्हवी कपूर नेहमीच तिची आई श्रीदेवीच्या काही आठवणी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवी चैन्नईला गेली होती. चैन्नईतील श्रीदेवी यांचं घर जान्हवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवलं. हे तेच घर आहे जे श्रीदेवी यांनी पहिल्यांदा विकत घेतलं. लग्नानंतर त्या या घराला सजवणार होत्या. त्यासाठी जगभरातून त्या सजावटीच्या वस्तू खरेदी करायच्या. घराची सफर करताना बोनी कपूरही बसलेले दिसतात. जान्हवीचं कुटुंबही या घरात आलं होतं. जान्हवी म्हणाली की २०१८ ला श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर या घराचं नूतनीकरण करण्यात आलं, जेणेकरून या घरात येऊन आईच्या आठवणी जागवल्या जाव्यात.
श्रीदेवींच्या आठवणी सांगताना जान्हवी म्हणाली, 'आई कधीच बाथरुमचा दरवाजा आतून बंद करायची नाही आणि मलाही ती कधीच असं करू द्यायची नाही. आईच्या चैन्नईच्या घरात तिच्यासोबतच्या खूप आठवणी आहेत म्हणून मला हे घर आवडतं. या घरातील माझ्या रूमच्या बाथरुमला आतून कडी नाही. बाथरुम आतून लॉक करायची नाही अशी आईची अट होती. तिला असं वाटायचं की मी आत जाऊन बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत बसू नये. माझी रूम खूप छान सजवली पण बाथरुमला मात्र आतून कडी लावली गेली नाही. जान्हवीच्या बाथरुमला आतून कडी नसण्याचं हे कारण ऐकून अनेकांनी श्रीदेवी यांना वाटणाऱ्या काळजीचं कौतुक केलं.