Ganeshotsav 2022 : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

in #pune2 years ago

Thursday, September 1, 2022
AMP

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
मनोरंजन

देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Ganeshotsav 2022 : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
Published on : 1 September 2022, 7:02 am

By

  • मंगेश कोळपकर

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर गुरुवारी पहाटे उमटले आणि वातावरण मंगलमय होऊन गेले. निमित्त होते ते ऋषिपंचमीचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने आयोजित केलेल्या सामूहिक अथर्वशीर्षपठणाचे.कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया, असेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले. तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडताना दहीहंडीला काही वेळ शौर्याने लटकत एकटयाने दहीहंडी फोडणा- या प्रथमेश कारळे या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळाच्या गोविंदास ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह, महावस्त्र व २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झालीesakal_new__2_.jpg

Sort:  

Please like my post ✨