सरबजित सिंग यांच्या पत्नीचं पाकिस्तानात अपघाती निधन

in #news2 years ago

अनेक वर्षं पाकिस्तानच्या कैदेत राहणारे हिंदुस्थानी नागरिक सरबजित सिंग यांच्या पत्नीचे पाकिस्तनात अपघाती निधन झाल्याचं वृत्त आहे. सुखप्रीत कौर असं या महिलेचं नाव आहे.

सुखप्रीत या दुचाकीवरून जात असताना फतेहपूर नजीक अचानक तोल जाऊन कोसळल्या. त्यांना त्वरित रग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथे त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर तरणतारण येथील भिखीविंद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पूनम आणि स्वप्नदीप कौर अशा दोन मुली आहेत.

सरबजित सिंग यांना पाकिस्तानने कैदेत ठेवलं होतं. त्यांच्यावर दहशतवाद पसरवणे आणि गुप्तहेरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांना पाकिस्तानी कोर्टाने 1991मध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. पण, त्या आदेशावर नंतर अनिमयित काळासाठी स्थगिती आणण्यात आली. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या कैदेत होते. 2013मध्ये एका तुरुगांतील सहकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.b1134faf0abeed25c8fbcb85d5123c5ccea9c86fde4435b4f478fb89359f1b1e.webp