“मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल

in #news2 years ago

vedaat-marathe-veer-daudale-saat-akshay-kumar.jpgदिग्दर्शक महेश मांजरेकर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चर्चांचे मुख्य कारण त्यांचा आगामी मराठी चित्रपट ठरला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकची झलकही सर्वांसमोर आली आहे. त्यानंतर मात्र याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षयची केलेली निवड अनेकांना अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे नेटकरी सध्या महेश मांजरेकर आणि अक्षयला ट्रोल केलं जात आहे. पण नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भूमिकेसाठी अक्षयची निवड का केली याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “हा लूक अजून फायनल झालेला नाही…” छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमारचे जाहीर वक्तव्य

आणखी वाचा

Aaditya thackeray Uddhav thackeray Eknath Shinde
आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”

Ind Zim Rain
Ind vs Zim: शेवटच्या सामन्यात पाऊस पडला तर…; पाकिस्तानपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने भारत स्पर्धेबाहेर पडणार की…

Sanjay Bangar Mantralaya
‘तू मला शिकवणार का?’ मंत्रालयाच्या गेटवर अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला संतोष बांगर यांची शिवीगाळ? आमदार म्हणाले “त्याने मला…”

Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विज