रवी राणा-बच्चू कडू वादात जनतेचे प्रश्न मागे पडतायत’, प्रश्न ऐकताच नवनीत राणा म्हणाल्या “मी घरी

in #news2 years ago

Navneet-Rana-Bachchu-Kadu.jpgराज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याला हा वाद वाढवायचा नाही असं सांगितलं आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. दरम्यान रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही यावर भाष्य केलं आहे.

“मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. हा माझा विषय नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं असून, मी त्यासाठी जात आहे,” असं त्यांनी मुंबईला निघण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. ज्याप्रमाणे ते बोलतात त्यापमाणे आम्ही करतो,” असंही त्यांनी