128GB मेमरी आणि 6GB रॅम असलेल्या रेडमी 5G फोनवर जबराट डिस्काउंट; दीर्घकाळ टिकणारी बॅटरी

in #newpost2 years ago

शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमीच्या नोट सीरिज अंतर्गत फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स स्वस्तात देण्याचे प्रयत्न करते. आता रेडमी नोट 12 सीरिज जागतिक बाजारात आली आहे, जी लवकरच भारतात येईल. त्यामुळे जुना Redmi Note 11T 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन 5G सपोर्ट, 128GB स्टोरेज, 6GB रॅम, मीडियाटेक Dimensity 810 5G प्रोसेसर आणि 33W Pro Fast चार्जिंगसह लाँच झाला आहे. रेडमीचा हा फोन अ‍ॅमेझॉनवर 14 टक्के डिस्काउंटसह 17,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत लिस्ट आहे. परंतु बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरमुळे याची किंमत आणखी कमी होईल.

Redmi Note 11T 5G वरील डिस्काउंट आणि ऑफर
Amazon वर Redmi Note 11T 5G स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये लिस्ट आहेत. या फोनवर सध्या 14% डिस्काउंट मिळत आहे, त्यामुळे फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली आहे. अ‍ॅमेझॉनवर हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल, जो 860 रुपये दरमहा इतका आहे. तसेच रेडमीच्या या फोनच्या बदल्यात जुना फोन एक्सचेंज केल्यास आणखी सूट मिळवता येईल. परंतु एक्सचेंज डिस्काउंट तुमच्या पुराने फोनच्या व्हॅल्यू आणि कंडीशनवर अवलंबुन असते.