बच्चू कडू मंत्रीपदासाठी प्रचंड आशावादी, कोणतं खातं हवं तेही सांगितलं…

in #nagpur2 years ago

पुणे : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद (Ministery) मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. “पुन्हा मंत्री झालो तर आवडेल. त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढतो. या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं. त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल, असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं आहे.Bacchu-kadu-on-disabled-ministery-Uddhav-Thackeray-Sanjay-Raut-Shivsena-Devendra-Fadnavis.jpg