Maharashtra Politics: चित्रा वाघ नाराज; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? नेत्याचा खुलासा

in #nagpur2 years ago

ठाकरे गटाच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या एका विधानामुळं भाजपधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? अशी चर्चा सुरू झाली आहे. (maharashtra politics Chitra Wagh BJP upset Leader disclosure Shiv Sena Sushma Andhare)
चित्रा वाघ आमदारकी न दिल्याने नाराज आहेत. त्यामुळे सोयीच्या मुद्द्यावर ते चित्रविचित्र बोलत असतात. . सोयीच्या भूमिका मांडणाऱ्या चित्रा वाघ सध्या आमदारकी न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत अडकल्या आहेत", अशी बोचरी टीका शिवसेना उपनेत्या अंधारे यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
माध्यामांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'सारखं भाजपची बाजू लावून धरल्यावर भाजप आपल्याला आमदारकी देईन, असं चित्रा वाघ यांना वाटत होतं. पण त्यांचा अंदाज फेल गेला. त्यांना काय आमदारकी मिळाली नाही. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत सापडल्या आहेत. भाजपने त्यांची आमदारकी डावलल्यानंतर त्या वाटेल त्या पद्धतीने बरळत राहतात.हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....चित्रा वाघ चित्रविचित्र बोलत असतात. ते फार मनावर घेण्यासारखं नाही. त्या फक्त भाजपशी बांधिल राहून बोलतात. कारण या त्याच चित्रा वाघ आहेत ज्यांनी कठुआ, हाथरस उन्नाव प्रकरणी तोंड उघडलेलं नव्हतं. त्यामुळे अशा राजकीय रोजगार हमीचे मजूर म्हणून काम करणारे कार्यकर्ते आहेत, मला त्यांच्यावर फार बोलायचं नाही", म्हणत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली.citra_vagh.jpg