आज आपण मेंदूहीन राज ठाकरेंना…” राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर

in #nagpur2 years ago

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात चौफेर टीका केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायची लायकी नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंच्या या टीकेला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज आपण मेंदूहीन राज ठाकरेंना बोलताना पाहिलं, अशी खोचक टीका अतुल लोंढे यांनी केली.raj-thackeray-6.jpg