Russia-Ukrain: रशियाची मोठी घोषणा; उद्या युक्रेनचे 4 प्रदेश अधिकृतरित्या रशियाला जोडणार

in #nagpur2 years ago


मॉस्को : युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. रशियानं युद्धात युक्रेनचे चार प्रांत काबिज केले असून हे प्रांत उद्या अधिकृतरित्या रशियाच्या हद्दीला जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्या प्रवक्त्यानं आज ही माहिती दिली. (Russia to formally annex four Ukraine regions tomorrow)
प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, "उद्या ग्रँड क्रेमलिन पॅलेसच्या जॉर्जियन हॉलमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता (आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजता) रशियामध्ये नवीन प्रदेशांच्या समावेशाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या होतील"
युक्रेनचे लुगांस्क, डोनेस्तक, खेरसन आणि झापोरिझ्झिया हे प्रदेश रशियन सैन्याच्या ताब्यात आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतिन यांनी सैन्याला या राज्यांच्या सीमेवर तैनात केले होते. रशियाने त्याचे नियंत्रण असलेल्या चार प्रदेशांमध्ये सार्वमताचं देखील आयोजन केलं आहे. क्रेमलिनच्या रहिवाशांनी रशियामध्ये सामील होण्यास पाठिंबा दर्शविल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.