स्मार्टफोनच्या वापराचा पालकांवर होतोय परिणाम; मुलांवर होते चिडचिड

in #nagpur2 years ago


स्मार्टफोनच्या वापरामुळे आपण बाहेरच्या जगाशी जोडले जात असलो तरीही त्यामुळे आपण आपल्या कुटुंबापासून दूर होत आहोत.
आजकालच्या डिजीटल जगात टिकाव धरण्यासाठी स्मार्टफोनचा (smartphone)वापर अनिवार्य आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोन वापराची सवय लागली आहे. स्मार्टफोन हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहीजण त्याचा वापर अगदी कामापुरता, गरजेपुरताच करतात, मात्र काही व्यक्ती अगदी त्याच्या आहारी गेल्या आहेत. आधी केवळ प्रोफेशनल लाईफपुरता मर्यादित असलेला स्मार्टफोन आता खासगी आयुष्यावरही प्रभाव टाकत आहे. कॅनडामध्ये नुकताच या संदर्भात एक संशोधन (research)करण्यात आले असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, स्मार्टफोन आणि इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांचे (parents) आपल्या मुलांशी वागणे बदलले आहे. ते त्यांच्यावर चिडचिड करू लागले आहेत.