मुलीच्या फी चे पैसे चोरट्याने लांबवले, फरार चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरु

in #nagpur2 years ago


संतोष ढाकणे हे आपल्या कुटुंबासमवेत शहरातील शक्ती कुंज वसाहतीतील इमारतीत राहतात. ढाकणे हे औष्णिक विद्युत केंद्रात कामाला आहेत. ढाकणे यांची पत्नी गृहिणी आहे तर मुलगी अंबाजोगाई येथे शिक्षण घेत आहे.
फी भरण्यासाठी ठेवलेल्या पैशांसह सोन्याचे दागिने (Jewellery and Cash Theft) चोरट्याने चोरुन नेल्याची घटना बीडच्या परळी शहरातील (Parali City Beed) शक्ती कुंज वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी संतोष बाळासाहेब ढाकणे यांच्या तक्रारीनुसार संभाजीनगर पोलीस ठाण्यात (Sambhaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने ढाकणे यांच्या घरी घरफोडी केली