PM मोदींच्या आवाहनावर रुपाली पाटलांचं ट्विट; दिला फडणवीसांचा दाखला!

in #mumbai2 years ago

Modi_Rapali_Patil.jpgपुणे : स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर सडकून टीका केली. तसेच घराणेशाहीचं राजकारण संपवण्याच्या लढ्यात आपल्याला साथ द्या, असं आवाहनही जनतेला केलं. मोदींच्या या आवाहनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी फडणवीस कुटुंबाचा राजकीय प्रवासाचा दाखला दिला आहे.