मी एवढ्यासाठीच थांबलो होतो की…”, शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

in #mumbai2 years ago

ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी किर्तीकर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाला मोठा फायदा होईल, अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची ठाकरे गटाकडून नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रवेशानंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं.