सुपारी व्यापारी अडकित्त्यात; मुंबई, नागपूरमध्ये ईडीच्या १७ ठिकाणी धाडी

in #mumbai2 years ago

दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड कराराचे उल्लंघन करत म्यानमारमार्गे तस्करी करून भारतात आणलेल्या दुय्यम दर्जाच्या सुपारीसाठ्याचा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई आणि नागपूर येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी १७ ठिकाणी छापेमारी केली. त्यात साडेअकरा कोटी रुपये मूल्याची २८९ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली. तसेच १६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. जप्तीची ही कारवाई नागपुरात झाली. या प्रकरणी तीनच दिवसांपूर्वी ईडीने नागपूरमधील काही सुपारी व्यापाऱ्यांवर छापेमारी केली होती.