जळगावात आढळला गंगा, ब्रह्मपुत्रेतील ‘स्पॉटेड सेल बार्ब’ मासा

in #mumbai2 years ago

गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये आढळणाऱ्या ‘स्पॉटेड सेल बार्ब’ या माशाची जिल्ह्यातील वाघूर धरणात नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मत्स्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे. ‘टॅप्रोबॅनिका’ या इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत या अभ्यासकांचा शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. वन्यजीव संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळकृष्ण देवरे आणि कल्पेश तायडे यांनी ‘शोध गोड्या पाण्यातील माशांचा’ याद्वारे ३४ प्रजातींची नोंद घेतली आहे. त्यात ‘स्पॉटेड सेल बार्ब हा महाराष्ट्रात प्रथमच दिसला आहे.

२०२१ मध्ये झाली होती नोंद ‘स्पॉटेड सेल बार्ब’चा शोध बंगालच्या ईशान्य भागातून हॅमिल्टनने १८२२ मध्ये लावला