सायफळ येथे सुरू असलेले सिमेंट रोडचे काम नीत्कृष्ट दर्जाचे..

in #mahurnews2 years ago

माहूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सायफळ ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती योजनेतून आलेल्या सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. सिमेंट क्रॉकीटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून अंदाजपत्रकाला डावलून सुरु आहे. सदर रस्त्याचे बांधकाम सायफळ येथील एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.
संबंधित ठेकेदाराने सिमेंट रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे करत आहे. सिमेंट रस्त्याची जागा न खोदता त्याच्यावर मुरूम न टाकता त्याच्यावर ढबर न टाकता डायरेक्ट कॉक्रेट ओतले आहे. लाखो रुपयांचा रस्ता 50,000 हजार रुपयात पूर्ण करायचा ठेकाघेतला आहे का? संबंधित अधिकारी चौकशी करणार का याच्यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित कामाची तक्रार लवकरच गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती गावकऱ्यानी दिली आहे...

संबंधित ठेकेदाराने आमच्या प्रतिनिधीला धमकी दिली आहे की माझ्या कामाची जर बातमी लावली तर मी काय करू शकतो ते तुला माहीत होईल. त्या धमकीची लवकरच वाईस क्लिप वायरल होईल व म मराठी न्यूज नेटवर्क वर.