Video | महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री करणार! उद्धव ठाकरे यांचे मोठे संकेत, कोण असेल तो चेहरा?

in #maharastra2 years ago

मुंबईः महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री (Lady CM) विराजनमान करण्याचे मोठे संकेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं. पक्षाचे चिन्ह म्हणून अन्याय जाळणारी मशाल आपल्याला मिळाली आहे. ही अंधःकार दूर करणारी मशाल आपण तितक्याच ताकतीने वापरू, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. तसेच आगामी मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदाविषयी संकेतही दिले.मुंबईत काल लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या वेळी उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं.उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. शिवशक्ती भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. मी सध्या अनुभवतोय… गद्दार आता मूठभरही नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत.

भाषणात पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो किंवा पुरुष…Uddhav-Thackeray-14.jpg