नोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) 2016 साली नोटांबदी (Demonetization) केली होती. त्यानुसार चलनातून 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्या. मात्र बँकेने या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून दिल्या. यानंतर आता नाणेबंदी (Coins) होणार आहे. तुमच्याकडे 1 रुपये आणि आठ आण्याचं नाणं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 1 रुपया आणि 50 पैशांचं नाणं बँकेत जमा करु शकता. मात्र बँकेकडून (Bank) तुम्हाला त्याबदल्यात तेच नाणं मिळणार नाही, तर नवं नाणं मिळेल. (after demonetization now may be 50 paise and 1 ruppes old coin are out circulation icici bak notice)विविध मीडिया रिपोर्टनुसार, तांबे आणि निकलपासून (चांदीसदृश धातू) बनवण्यात आलेले 1 रुपये आणि आठ आण्याचं नाणं चलनातून बाद होणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती आयसीआयसी बँकेच्या (ICICI BANK) शाखेत असलेल्या नोटीसच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. दरम्यान आरबीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नवी दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेकडून ही नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार काही नाणी पुन्हा व्यवहारत न आणण्याची सूचना आहे. याचाच अर्थ असा की एकदा का जुनी नाणी बँकेत जमा केली की बँकेकडून कुणालाही ती नाणी व्यवहारासाठी दिली जाणार नाहीत. आरबीआय ही नाणी सर्व बँकेकडून मागवून घेईल.

त्यामुळे ही अशी जुनी नाणी व्यवहारातून बाद होतील. ही नाणी वैध आहेत. मात्र ती व्यवहारातून बाद होतील. ही नाणी 1990 आणि 2000 या दशकातील आहे. बँकेकडून दिलेल्या नोटीशीनुसार आणि आरबीआयच्या निर्देशानुसार अशी नाणी पुन्हा दिली जाणार नाहीत. 541190-coins-icici-bank.jpeg