अवघ्या 15 चेंडूत विजय, केनिया संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नव्या विक्रमाची नोंद

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकासाठी सब रिजनल आफ्रिका क्लालिफायर सामने केळले जाते आहेत. यातील 10वा सामना केनिया आणि माली संघात खेळला गेला. या सामन्यात माली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार चेइक केइता (Cheick Keita) याने घेतलाल हा निर्णय चुकीचा ठरला. कारण माली संघाची धावसंख्या अवघी 8 अशताना त्यांच्या 6 फलंदाजांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यांचा फक्त एक फलंदाज 10 धावांचा टप्पा ओलांडू शकला होता.

माली संघाचे 6 फलंदाज खातेही खोलू शकले नाहीत
माली संघासाठी थियोडोर मकालू (Theodore Macalou) हा एकटा फलंदाज होता, ज्याने 10 पेक्षा जास्त म्हणजेच 12 धावांची खेळी केली. या धावा करण्यासाठी त्याने 20 चेंडूंचा सामना केला. त्यांचे 6 फलंदाज एकही धाव न करता तंबूत परतले. माली संघ या सामन्यात 10.4 षटकांमध्ये 30 धावा करून सर्वबाद झाला. केनियासाठी वेगवान गोलंदाज पीटर लंगाट याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. मालीकडून मिळालेले 3 धावांचे लक्ष्य केनियाचे सलामीवीर पुष्कर शर्मा आणि कोलिंस ओबुया यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. केनियाने एकही विकेट न गमावता 2.3 षटकात हा सामना जिंकला. म्हणजेच तब्बव 105 चेंडू शिल्लक ठेवून केनिया संघ विजयी झाला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चेंडूंच्या बाबतीत हा एखाद्या संघाला मिळालेला सर्वात मोठा विजय आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम मोडीत –
यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या नावावर हा विक्रम होता. ऑस्ट्रेलियाने 31 ऑगस्ट 2019 मध्ये तुर्की संघाविरुद्ध 2.4 षटकात 10 विकेट्स राखून विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 104 चेंडू शिल्लक ठेवून नावावर केला होता, पण केनियाने आता त्यांचा हा विक्रम मोडीत काढला आहे. Kenya-Cricket-Team-.png